गोपनीयता धोरण
हे संकेतस्थळ सामान्यतः तुमच्याकडून अशी कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती (जसे की नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता) स्वयंचलितपणे जमा करून घेत नाही, जेणेकरून, आम्हाला तुमची वैयक्तिकरीत्या ओळख पटवता येईल. इंटरनेट प्रोटोकॉल (आय. पी.) पत्ते, जन व्यासपीठावरील (डोमेन) नाव, ब्राउझर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टिम, भेटीची तारीख आणि वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे अशा सांख्यिकीय हेतूंसाठी हे संकेतस्थळ, तुमच्या भेटीशी संबंधित बाबी नोंदवते. जोपर्यंत संकेतस्थळाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीशी हे पत्ते जोडण्याचा आम्ही कोणताही प्रयत्न करत नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने सेवा प्रदात्याच्या लॉगची तपासणी करण्यासाठी वॉरंट बजवल्या खेरी, आम्ही वापरकर्ते किंवा त्यांचा ब्राउझिंग इतिहासाची ओळख पटवत नाही.जर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संकेतस्थळाने तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली असेल आणि तुम्ही ती देण्याचा पर्याय निवडला असेल तर कशी वापरली जाईल हे तुम्हाला कळवले जाईल आणि तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या जातील.