दिव्यांग व्यक्तींसाठी योजना

शासनाचे डी.बी.टी. पोर्टल दिव्यांग व्यक्तींना शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एकल-खिडकी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देते. हे पोर्टल दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेची पात्रता तपासणे, ऑनलाईन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्जाच्या स्थितीचा पारदर्शक आणि कागदरहित पद्धतीने मागोवा घेण्याची सुविधा प्रदान करते.
अनेक शासकीय प्रणालींशी एकात्मिक असलेले हे व्यासपीठ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचे थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) आणि सुलभ पडताळणी प्रक्रिया सुनिश्चित करते. कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुलभता वाढविण्यासोबतच मानवी हस्तक्षेप व प्रक्रियेस लागणारा वेळ कमी करून राज्यभरातील योजनांच्या लाभांचे वेळेवर वितरण आणि प्रभावी देखरेख सुनिश्चित करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी योजना पुढीलप्रमाणे
- पूर्व-मॅट्रिक शिष्यवृत्ती
- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती