संकेतस्थळ सुरक्षा धोरण
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित या संकेतस्थळाकरिता सुरक्षित सर्व्हर वापरते. आम्ही आधारसामग्री (डेटा) अखंडता जपण्यासाठी आणि आमच्या ताब्यात असलेल्या खाजगी माहितीची वाजवी सुरक्षितता राखण्यासाठी अनेक उपायोजना केल्या आहेत माहिती सुरक्षित ठेवण्याच्या सुरक्षेच्या उद्देशाने आमचे संकेतस्थळ होस्ट करणारी संगणक प्रणाली, त्याच्या उपकरणांशी छेडछाड करण्याचे अनधिकृत प्रयत्न ओळखण्यासाठी संकेतस्थळावर भेट देण्याऱ्या वापरकर्त्यांच्या कामावर संनियंत्रण ठेवण्यासाठी संगणकीय आज्ञावलीचा वापर करते. सुरक्षा संनियंत्रणादरम्यान घगु न्हेगारी कृत्यांचे संभाव्य पुरावे आढळ्यास अशा कृत्यासंबंधित माहिती, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरवली जाऊ शकते
संकेतस्थळ संनियंत्रण योजना
संकेतस्थळ संनियंत्रण धोरण अंमलात आहे आणि खालील मापदंडांनुसार गुणवत्ता आणि सुसंगततेच्या समस्या ओळखून त्यांचे निवारण करण्यासाठी संकेतस्थळाचे वेळोवेळी संनियंत्रण केले जातेः कामगिरी संकेतस्थळ डाउनलोड करण्याची वेळ विविध नेटवर्क जोडण्यांसाठी तसेच उपकरणांसाठी अनुकूल केली जाते. यासाठी संकेतस्थळाच्या सर्व महत्त्वाच्या पृष्ठांची चाचणी करण्यात येते. कार्यक्षमता संकेतस्थळावरील सर्व मॉड्यूल्सची त्यांच्या कार्यक्षमतेसाठी चाचणी केली जाते. फीडबॅक फॉर्मसारखे संकेतस्थळाचे परस्परसंवादी घटक सुरळीतपणे काम करत आहेत. तुटलेले दुवे (ब्रोकन लिंक्स) कोणतेही तुटलेले दुवे (ब्रोकन लिंक्स) किंवा त्रुटी काढून टाकण्यासाठी संकेतस्थळाचे सखोल पुनरावलोकन केले जाते. वापरकर्त्यांच्या भेटींचे विश्लेषण वापर पद्धती तसेच अभ्यागतांचे विश्लेषण करण्यासाठी संकेतस्थळावरील वापरकर्त्यांनी केलेल्या कामाचे सनियंत्रण केले जाते. प्रतिक्रिया अभ्यागतांनी सुचविल्याप्रमाणे बदल आणि सुधारणा करण्यासाठी अभिप्रायासाठी योग्य यंत्रणा आहे.